मुंबईत मृत्यूचा आकडा झाला दोन अंकी!

बुधवारी, 31 मार्च रोजी १ हजार ३६३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ५,३९४ रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईत कोविड बाधित रुग्णांची संख्या पुन्हा पाच हजारांवर जावून पोहोचली असून विशेष म्हणजे मृत्यूची संख्या आता वाढताना दिसत आहे. बुधवारी, 31 मार्च रोजी मुंबईत ५,३९४ रुग्ण आढळून आले. तर १५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी मृत्यूची संख्या दहा एवढी होती. परंतु आठ दिवसांमध्ये ही संख्या आता १५ पर्यंत जावून पोहोचली असून एकप्रकारे हा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा आहे.

मृत्यूचा आकडा वाढतोय!

मुंबईमध्ये बुधवारी ५,३९४ रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात ३,१३० रुग्ण बरे होवून घरी परतले. तर बुधवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या ५१ हजार ४११ वर पोहोचली आहे. दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांपैकी १४ रुग्णांना दिर्घकालिन आजार होते. यामध्ये ८ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे. २२ मार्च रोजी रुग्णांचा आकडा हा ३,२६० एवढा होता, तर त्यादिवशी १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या दिवसापर्यंत सक्रीय रुग्णांची आकडेवारी ही २५ हजार ३७२ एवढी हाती. त्यामुळे सक्रीय रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा १० वरून १५ वरून पोहोचला आहे. तर मंगळवारीही मृत्यूचा आकडा १० एवढा होता. तर सोमवारी मृत्यूची संख्या १२ एवढी होती. तर रविवारी मृत्यूचा आकडा हा ०८ एवढा होता. त्यामुळे यापूर्वी मृत्यूचा आकडा एकअंकी एवढाच होता. यापूर्वी सप्टेंबर महिन्यांमध्ये ४० ते ५०च्या घरात मृत्यूचा आकडा हा १० नोव्हेंबरनंतर २०च्या आतमध्ये आला होता. त्यानंतर मृत्यूचा आकडा कमी होवून तो चार ते पाचपर्यंत सीमित होता. परंतु पुन्हा एकदा हे आकडे वाढू लागले आहेत.

(हेही वाचा : खुशखबर! आता 500 रुपयांत आरटीपीसीआर चाचणी! )

रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला!

दिवसभरात ४१ हजार ३६३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ५,३९४ रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारपर्यंत ७४ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन झाले असून कंटेन्मेंट इमारतींची संख्या ६१६ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरी पार झालेला असतानाच आता तो ४९ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here