मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच कोरोना मृतांची संख्या आली शून्यावर

123

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच राज्यातील मृत्यूदरही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आता रविवारी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षांत पहिल्यांदाच मृतांची संख्या शून्यावर आल्याने मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे.

अशी आहे आकडेवारी

मुंबईत रविवारी एकूण 28 हजार 697 चाचण्या करण्यात आल्या असून, एकूण 367 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आढळून आले आहेत. तर 518 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नसून ही मुंबईकरांसाठी दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. मुंबईत सध्या सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 5 हजार 30 इतकी आहे.

(हेही वाचाः लसीचा एक डोस घेतला तरी करता येणार लोकल प्रवास? राजेश टोपेंनी दिली मोठी माहिती)

झोपडपट्ट्या व चाळी कन्टेंन्मेंट झोनमुक्त

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर सुद्धा 97 टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण दुप्पटीचा दर हा 1 हजार 214 दिवसांवर आला आहे. 10 ते 16 ऑक्टोबरदरम्यान कोविड वाढीचा दर हा 0.06 टक्के झाला असून, सीलबंद इमारतींची संख्या ही 50 इतकी झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील सर्व झोपडपट्ट्या व चाळी या संपूर्णपणे कन्टेंन्मेंट झोनमुक्त झाल्याचे रविवारी आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

(हेही वाचाः मुंबईत कोविड रुग्णांचा आकडा झाला ‘ट्रिपल थ्री’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.