कोरोना महामारीत 32 दशलक्ष मध्यमवर्गीय बनले गरीब! 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वर्ष उलटले आहे. आता जगातील विविध देशांमधील अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत असली तरी जगभरातील विकसनशील देशांमध्ये गरिबी वाढली आहे. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. 

86

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आता वर्ष उलटले आहे, या वर्षभरात जगभरातील अर्थव्यवस्था अक्षरशः डबघाईला आली. विकसित देश असो कि विकसनशील देश असो, सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे विकसनशील देशांना याचा जबर फटका बसला आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. वर्षभर लॉकडाऊन झाल्याने देशाची अर्थव्यवस्था ठप्प होती, त्याचा परिणाम म्हणून ३२ दशलक्ष मध्यमवर्गीय हे कनिष्ठ मध्यमवर्गीय बनले आहेत. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

काय म्हटले आहे या अहवालात? 

  • भारतातील मध्यमवर्गीय हे दिवसाला १०$ आणि २०$ अर्थात ७०० ते १५०० रुपये वेतन घेत होते, ते आता दिवसाला २०० ते २५० रुपये कमावत आहेत.
  • भारतात कोरोना महामारीच्या आधी ९९ दशलक्ष मध्यमवर्गीय होते, ती संख्या आता ६५ लक्षलक्ष बनली आहे.
  • मध्यमवर्गीयांच्या संख्येत झपाट्याने घसरण होऊ लागल्याने भारतात गरिबी वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
  • विशेष म्हणजे चीनच्या तुलनेत भारतातील गरिबीचा दर जास्त आहे.
  • भारतातात २०११ ते २०१९ या कालखंडात ५७ दशलक्ष मध्यमवर्गीय होते.
  • जानेवारी २०२० मध्ये जागतिक बँकेच्या नुसार भारत आणि चीन यांचा आर्थिक विकासदर ५.८ आणि ५.९ टक्के होता.

(हेही वाचा : यापुढे चुकीला माफी नाही… काय म्हणाले हेमंत नगराळे?)

इंधन दरवाढ, बेकारी, पगार कपातचा परिणाम!

सध्या भारत कोरोनाची दुसरी लाट अनुभवत आहे. अशाही वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पुढील वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर ८ टक्के ठरवण्यात आला आहे. १० टक्के इंधन दरवाढ, बेकारी, पगार कपात या कारणांमुळे कोट्यवधी कुटुंबे गरिबीच्या दिशेने सरकू लागली आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. तर चीनमध्ये १० दशलख मध्यमवर्गीय कुटुंबांचे राहणीमान खालावले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

प्यू रिसर्च सेंटर संस्था काय आहे?

अमेरिकास्थित ही स्वयंसेवी संस्था आहे. मायकल डिमॉक प्रमुख असलेल्या या संस्थेत एकूण १६० कर्मचारी काम करतात. ही संस्था विविध विषयांवर जनमत घेते, लोकसंख्याशास्त्र संशोधन, परीक्षण, माहिती संपादन करत असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.