देशात पुन्हा वाढला कोरोना; एकाच दिवशी ३,८२४ नवे रुग्ण

119

देशात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३,८२४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज तब्बल २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, शनिवारी देशात २९९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर शुक्रवारी ३,०९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८,३८९ आहे. एकूण आकडेवारीच्या ०.०४ टक्के आहे. कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत देशात ४,४७,२२,६०५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ४,४१,७३,३३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशातीच पॉझिटिव्हिटी रेट ९८.७७ टक्के आहे. तर दुर्दैवी बाब म्हणजे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,८८१ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत दोन वर्षांत २.२ अब्जाहून अधिक कोविड लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसीचे २,७९९ डोस देण्यात आले आहेत.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले; एकीकडे महाविकासची सभा दुसरीकडे भाजपाची सावरकर गौरव यात्रा)

महाराष्ट्रात ६६९ नवे रुग्ण

शनिवारी, १ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या ६६९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ८१,४४,७८० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १,४८,४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राज्यात ४२५  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी ६९४ रुग्णांची नोंद झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.