राज्यातील सरकारी रुग्णालयातील ५९८ निवासी डॉक्टर, वॉर्डबॉयलाही कोरोना

146

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील ५९८ निवासी डॉक्टरांना आतपर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर राज्यातील सरकारी आणि कामगार रुग्णालयातील वॉर्डबॉयचे काम करणार्‍या कामगारांनामध्येही आता कोरोनाचा फैलाव दिसून येत आहे.

५९८ कोरोनाबाधित निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

राज्यातील कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या शुक्रवारपर्यंत ५९८ पर्यंत पोहोचल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. ५९८ कोरोनाबाधित निवासी डॉक्टरांपैकी जेजेत १३४, कूपरमध्ये ७, केईएममध्ये ११५, सायनमध्ये २२, तर नायर ११० निवासी डॉक्टरांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील इतर जिल्हा रुग्णालयातील बाधित निवासी डॉक्टरांमध्ये लातुरात ५, धुळ्यात ८, मिरजमध्ये २, नागपूरात ६, औरंगाबादमध्ये ४, ठाण्यात १६, सोलापूरमध्ये २५, कोल्हापूरात २, पुण्यात १८, नांदेडमध्ये ७, पिंपरीत १०, अकोल्यात १, अंबेजोगाईत २ कोरोनाचे रुग्ण असल्याचे आतापर्यंत निदान झाले आहे.

(हेही वाचा महापालिका ‘त्या’ डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करणार)

सरकारी रुग्णालयातील वॉर्ड बॉयलाही कोरोनाची बाधा

यवतमाळला एक, उस्मानाबादला दोन, जळगाव, अहमदनगर, ठाणे ग्रामीण, अकोला, भंडारा, रायगड, रत्नागिरी या जिल्हातील सरकारी रुग्णालयातील प्रत्येकी दोन वॉर्डबॉयलाही कोरोना झाला आहे. नागपूर आणि नाशकातील सरकारी रुग्णालयात प्रत्येकी पाच वॉर्डबॉयलाही कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीतील सरकारी रुग्णालयातील तीन वॉर्डबॉयवर कोरोनावर उपचार सुरु आहेत. कांदिवलीतील कामगार रुग्णालयातील बारा वॉर्डबॉयलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.