खुशखबर…कोरोनाची रुग्ण संख्या आठवड्याभरात पाच हजाराने घसरली, पण…

123

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या दर दिवसाला एक हजाराने कमी होऊ लागली आहे. परिणामी आठवड्याभरात राज्यातील सक्रीय कोरोना रुग्ण संख्या पाच हजाराने कमी होत आता २० हजार ८२० वर नोंदवली गेली.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.  रुग्ण संख्या कमी होत असताना राज्यातील विविध भागांत मात्र रुग्ण दगावत आहेत. राज्यात मंगळवारी, ५ जुलै रोजी ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मृत्यूदर आता १.८५ टक्क्यांवर

मुंबई, वसई-विरार, पुणे, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरीत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्यात ३ हजार ९८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या २४ तासांत ४ हजार २०७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात मृत्यूदर आता १.८५ टक्क्यांवर नोंदवला जात आहे. तर कोरोना रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर नोंदवले गेले. मुंबईत आता ६ हजार ४०९ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहे. ठाण्यात ४ हजार ३७, पुण्यात ५ हजार ३३५, रायगडात ९६१ तर पालघरात ५११ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. नागपूरात ५८१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(हेही वाचा पावसामुळे मुंबईत दशकभरातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.