मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट

मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर १०६३ दिवसांवर गेला! 

मुंबईत मागील पाच दिवसांपासून रुग्ण संख्या पाचशेच्या आतच राहिलेली असून मंगळवारी ३५१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५३५ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एरव्ही ३५ ते ३८ हजार कोविड चाचण्या करणाऱ्या मुंबई महापालिकेने या चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे. मागील दोन दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण घटल्याने रुग्ण संख्याही कमी झालेली पहायला मिळत आहे.

१० रुग्णांचा मृत्यू!

मुंबईमध्ये मंगळवारी ५३५ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर मंगळवारपर्यंत ६ हजार १६१ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. तर मंगळवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. या १० रुग्णांपैकी ०९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ०६ रुग्ण हे पुरुष, तर ०४ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये एक रुग्ण चाळीसीच्या आतील होता. ०६ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत ०३ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.

मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर १०६३ दिवसांवर गेला! 

मुंबईतील रुग्णांचे बरे होण्याचा दर हा ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा १०६३ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या सातवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ५८ वर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here