मुंबईतील रुग्ण संख्या २० हजारांवर स्थिरावली

104

कोविड बाधित रुग्णांची संख्या पाच हजारांनी वाढल्यानंतर गुरुवारपासून २० हजारांमध्ये आढळून येणारी रुग्ण संख्या शनिवारपर्यंतही २० हजारांपर्यंतच स्थिरावल्याचे पहायला मिळाले आहे. गुरुवारी जिथे २० हजार १८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी सुमारे ८०० रुग्णांची भर पडत २० हजार ९७१ एवढे रुग्ण आढळून आले होते, तर शनिवारी ही संख्या २० हजार ३१८ एवढे आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी १,२५७ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी १०८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली गेली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात सहा हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात रुग्णांचा ५ मृत्यू झाला.

रुग्ण दुपटीचा दर ४७ दिवस झाला

शुक्रवारी ७२ हजार ४४२ चाचण्या करण्यात आल्यानंतर २० हजार ९७१ नवीन रुग्ण आढळून आले होते. तिथे शनिवारी ७१ हजार ०१९ चाचण्या केल्यानंतर २० हजार ३१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे दिवसभरात ६ हजार ००३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ७ हजार ७३४ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ०६ हजार ०३७ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ४७ दिवस एवढा होता. गुरुवारी झोपडपट्यांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या ३२ एवढी होती, पण शुक्रवारी ही संख्या ०६ एवढी होती, तर शनिवारी ही संख्या ०९ एवढी आढळून आली आहे. तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत ५०२ वरून शुक्रवारी ही संख्या १२३ एवढी झाली होती, तर शनिवारी ही संख्या १२० एवढी होती.

(हेही वाचा हिंदमातासाठी बनवलेल्या टाक्या आच्छादीत करायला विसरले…)

दिवसभरातील रुग्ण संख्या

  • एकूण बाधित रुग्ण : २०, ३१८
  • बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: १६,६६१ (८४टक्के)
  • गुरुवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : १,२५७
  • दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या : १०८
  • एकूण दाखल रुग्ण : ७,२३४
  • एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : १ लाख ०६ हजार ७३१
  • एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३३,८०३
  • रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : २१.४टक्के
  • बरे झालेले रुग्ण : ६,००३
  • दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०५
  • दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ७१,०१९
  • कंटेन्मेंट झोपडपट्टी: ०९
  • सीलबंद इमारती : १२०
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.