देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विशेष परिणाम झाला नसला तरी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी, २७ एप्रिल रोजी ही बैठक होणार आहे.
देशात २ हजार ५९३ नवे रुग्ण
देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्राने कोरोनासंदर्भातील अनेक निर्बंध हटवले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या थोडी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राज्यांना पत्रही लिहिले होते. दरम्यान आता कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे ही बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. कोरोनासंदर्भातील या आढावा बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही सामील होण्याची शक्यता आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क आणि अन्य उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. रविवारी देशात कोरोनाच्या २,५९३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ कोटी ३० लाख ५७ हजार ५४५ वर पोहोचली आहे. तर देशात १५ हजार ८७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
(हेही वाचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या दौऱ्यात गैरहजर! आतापर्यंत किती वेळा पंतप्रधानांना टाळले?)
Join Our WhatsApp Community