मुंबईत सलग दोन दिवस पाचशेच्या आत सीमित असणाऱ्या रुग्ण संख्येने बुधवारी पुन्हा एकदा हातपाय पसरले. बुधवारी दिवसभरात ६३५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मंगळवारी जिथे ४४१ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर दिवसभरात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १० एवढी होती.
बुधवारी ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्या!
मुंबईमध्ये बुधवारी ५८२ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर बुधवारपर्यंत ६,९८९ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. तर दिवसभरात ६३५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी ३० हजार १०० कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४४१ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ६३५ नवीन रुग्ण आढळून आले. तर मंगळवारी जिथे ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तिथे बुधवारी मृत्यूचा आकडा १० वर एवढा झाला होता. या १० रुग्णांपैकी ०५ रुग्णांना दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये ०४ रुग्ण हे पुरुष तर ०६ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये २ रुग्ण हे चाळीशीच्या आतील आहेत. तर ४ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत ४ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.
(हेही वाचा : डीएनए चाचणीविना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा)
रुग्ण दुप्पटीचा दर हा पोहचला ९२८ दिवसांवर!
मुंबईतील रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९२८ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या आठवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ७५ वर आली आहे
Join Our WhatsApp Community