मुंबईतील शनिवारी, ३ जुलै रोजी ५७५ नवीन रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी जिथे ३८ हजार ६५२ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ६७६ रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत शनिवारी ३५ हजार ४९१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ५७५ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर रुग्ण दुपटीचा दर हा ७५२ दिवसांवर आला आहे.
दिवसभरात एकूण २१ रुग्णांचा मृत्यू!
मुंबईमध्ये शनिवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण अर्थात सक्रीय रुग्णांची संख्या ही ८ हजार २९७ एवढी आहे. तर दिवसभरात एकूण ८५१ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. शुक्रवारी जिथे २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शनिवारी दिवसभरात एकूण २१ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूपैकी १७ रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेल्यांपैकी होते. तर यामध्ये १२ रुग्ण हे पुरुष, तर ९ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील १२ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते, तर उर्वरीत ०९ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते.
(हेही वाचा : पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी महापालिकेची उघडली तिजोरी!)
शनिवारी रुग्ण दुप्पटीचा दर ७५२ दिवस एवढा होता!
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर हा शनिवारी ७५२ दिवस एवढा होता. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण असले तरी सक्रीय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या १४ एवढी आहे, तर सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या पाचने कमी होवून ६६ एवढी आहे. शुक्रवारी ही संख्या ७१ एवढी होती
Join Our WhatsApp Community