कोविड रुग्णांचा आकडा पाचशेच्या खाली

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा सोमवारी ८०२ दिवस एवढा होता.

मुंबईतील रुग्णांचा आकडा पाचशेच्या खाली उतरला असून सोमवारी, ५ जुलै रोजी ४८९ नवीन रुग्ण आढळून आले आहे. अर्थात कोविड चाचण्यांची संख्या कमी झाल्याने हा रुग्णांचा आकडा घटलेला पाहायला मिळत आहे. रविवारी ३७ हजार १२८ कोविड चाचणी केल्यानंतर ५४८ रुग्ण आढळून आले होते, सोमवारी ३० हजार ७३७ चाचण्या केल्यानंतर ४८९ रुग्ण आढळून आले आहेत.

एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला!

मुंबईमध्ये सोमवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण अर्थात सक्रीय रुग्णांची संख्या ही ७ हजार ९२७ एवढी आहे. तर दिवसभरात एकूण ६४५ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. रविवारी जिथे २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे सोमवारी दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूपैकी ७ रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेल्यांपैकी होते. तर यामध्ये ७ रुग्ण हे पुरुष तर ३ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील तर ०५ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते, तर उर्वरीत ०५ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते.

(हेही वाचा : टाळी वाजवणारे हात आता वळणार स्वयंरोजगारांकडे!)

रुग्ण दुप्पटीचा दर हा सोमवारी ८०२ दिवस एवढा होता!

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर हा सोमवारी ८०२ दिवस एवढा होता. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असले तरी सक्रीय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या १३ एवढी आहे, तर सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या पाचने कमी होवून ६५ एवढी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here