मुंबईतील रुग्ण आकडा सातशेच्या आत स्थिरावला!

रुग्ण दुप्पटीचा दर ७३३ दिवसांवर आला!

 कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा सातशेच्या आत स्थिरावलेला असून बुधवारी, ३० जून रोजी जिथे ६९२ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी ६६१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी जिथे ३८ हजार ७८ चाचण्या केल्यानंतर ६९२ रुग्ण आढळून आले होते, तर गुरुवारी ३८ हजार ६५२ चाचण्या केल्यानंतरही ६६१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी जिथे २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली हेाती, तिथे गुरुवारी २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली  होती.

एकूण २१ रुग्णांचा मृत्यू झाला!

मुंबईमध्ये  गुरुवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण अर्थात सक्रीय रुग्णांची संख्या ही ८ हजार ४८९ एवढी आहे. त्यामुळे सक्रीय रुग्ण आणि नवीन आढळून येणारे रुग्ण यांची संख्या कमी होत असल्याने  मुंबईकरांसाठी ती समाधानाची बाब आहे. तर दिवसभरात एकूण ४८९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. गुरूवारी दिवसभरात एकूण २१ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूपैंकी १२ रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेल्यांपैकी होते. तर यामध्ये १२ रुग्ण हे पुरुष तर ९ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ३ मृत पावलेले रुग्ण हे चाळीशीच्या आतील होते, तर १२ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते, तर उर्वरीत  ०६ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते.

रुग्ण दुप्पटीचा दर ७३३ दिवसांवर आला!

मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर हा बुधवारी ७१६ दिवस एवढा होता, तर गुरुवारी हा दर ७३३ दिवसांवर आला होता. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण असले तरी सक्रीय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टी  व चाळींची संख्या ११ एवढी आहे, तर सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या पाचने कमी होवून ७५ एवढी झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here