मुंबईत मागील काही दिवसांपासून सहाशेपर्यंत वाढत गेलेला कोविड रुग्णांचा आकडा निम्म्यावर आलेला असून शनिवारी दिवसभरात ३३३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ५२६ रुग्ण बरे झाले असून विविध रुग्णालयांमध्ये सध्या ५,१८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला
मुंबईत कोविडबाधित रुग्णांच्या शनिवारी ३३ हजार २ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३३३ नवीन रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दिवसभरात ३७ हजार ९७८ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये दिवसभरात ४८८ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णांपैकी सर्व रुग्ण दीर्घकालीन आजाराचे होते. यात १ रुग्ण पुरुष तर २ रुग्ण महिलेचा समावेश होता. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा असून रुग्ण दुपटीचा दर हा १,१४१ दिवस एवढा आहे. सक्रीय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्ट्या व चाळींची संख्या शून्य आहे, तर सीलबंद इमारतींची संख्या ५६ एवढी आहे. सध्या मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र तरीही कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.
(हेही वाचा : सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत भाजपाने ‘हा’ केला गंभीर आरोप!)
Join Our WhatsApp Community