मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होतेय!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५९८ दिवसांवर आला आहे.

75

मुंबईतील रुग्णसंख्या मागील आठवडाभरापासून रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.गुरुवारी, १० जून रोजी संपूर्ण दिवसभरात जिथे ६६० रुग्णांची नोंद झाली होती, तिथे शुक्रवारी ६९६ रुग्ण आढळून आले. संपूर्ण दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

२४ रुग्णांचा मृत्यू!

शुक्रवारी संपूर्ण दिवसभरात ६५८ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २६ हजार २२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शुक्रवारपर्यंत १४ हजार रुग्णांवर उपचार सरु आहेत.गुरुवारी २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथेशुक्रवारी २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १३ पुरुष आणि ११ महिला रुग्णाचा समावेश होता. यामध्ये ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. ६० वर्षांवरील १३ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ८ एवढी होती.  सोमवारी, ७ जूनपासून मुंबईत अनलॉक सुरु झाले, अशा वेळी रुग्ण संख्या कमी होत आहे, हे सकारात्मक बाब आहे.

(हेही वाचा : ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता)

रुग्ण दुपटीचा दर ५९८ दिवसांवर आला!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५९८ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ९२ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही २४ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.