सिंगापूरनंतर आता भारतातही कोरोनाचा नवा प्रकार पसरला आहे. भारतात 290 जणांना कोविड – 19 चा उपप्रकार KP.2 आणि KP.1 विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे दोन्ही JN1प्रकाराचे उपव्हेरियंट आहेत. हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजाराशी संबंधित नाहीत, त्यामुळे काळजी करण्याचे किंवा घाबरण्याचे कारण नसल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली असून ते पुढे म्हणाले की, भारतीय सार्स-कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियमने या प्रकरणाची दखल घेतली आहे. भारतीय सार्स-कोव-२ जीनोमिक्स कंसोर्टियमच्या मते ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1ची एकूण ३४ प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी २३ प्रकरणे बंगालमध्ये नोंदवली गेली आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात ४, गुजरातमध्ये २, राजस्थानमध्ये २, गोव्यात १, हिरयाणामध्ये १ आणि उत्तराखंडमध्ये १ रुग्ण आढळला आहे. KP.2उप प्रकाराची २९० प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक १४८ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
(हेही वाचा – Mamata Banerjee: राज्यात २०१०पासून जारी केलेली OBC प्रमाणपत्रे रद्द, हायकोर्टाचा ममता बॅनर्जींना दणका)