कोरोनामुळे सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. या तीन राज्यांत कोरोनाने मान टाकलेली असताना दिल्लीने आता धडकी भरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्लीत बुधवार, २० एप्रिल रोजी महत्वाचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मास्क वापरण्याची सवय मोडल्याचे परिणाम
दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्के हा धोकादायक आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ६३२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर ४१४ बरे झाले. या पार्श्वभूमीवर डीडीएमएची महत्वाची बैठक घेतली जाणार आहे. दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत दिल्ली आणि एनसीआरमध्ये रुग्ण का वाढत आहेत. टेस्टिंग सहा-सात हजार होत आहेत. त्यापैकी ५०० ते ६०० लोकांना कोरोना झाल्याचे समोर येत आहे. यामागे नवा कोरोना व्हेरिअंट आहे की अन्य कोणते कारण हे देखील पाहिले जाणार आहे. याच महिन्यात देशभरात मास्क सक्ती काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यानंतर पॉझिटिव्हीटी दर शून्याच्या आसपास गेला होता. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये जे रुग्ण सापडत आहेत ते देखील दिल्ली सीमेवरील आहेत. यामध्ये मुलांची संख्या मोठी आहे. ICMR च्या तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांच्यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढीमागे लोकांची मास्क वापरण्याची सवय संपली आहे. त्याचबरोबर लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊ लागले आहेत. पूर्वी ते मास्क वापरत होते, आता बिनदिक्कत फिरत आहेत. पुन्हा एकदा कोरोना निर्बंधांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे आणि मास्कही गरजेचे आहे.
(हेही वाचा मशिदींवरील ‘ते’ भोंगे आता उतरवावेच लागणार! )
Join Our WhatsApp Community