आयसीयू कक्षात कोरोनाबाधित रुग्णाने केली आत्महत्या..काय आहे कारण?

तळेगाव पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मडिकल एज्युकेशन अँड रिसर्च(MIMER) रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील आयसीयू कक्षात असलेल्या ४४ वर्षीय रुग्णाने आयसीयू कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर आरोप

कोरोनाबाधित झाल्यानंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला MIMER रुग्णालयात दाखल केले होते. पण या रुग्णाने उपचारादरम्यान अचानक आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र, अजून कळू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आत्महत्येला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी मृताच्या नातेवाईकांनी केली. याबाबत तळेगाव पोलिस अधिक तपास करत असून, आत्महत्येमागचे कारण शोधत आहेत.

(हेही वाचाः कोविड मृत्यूंची संख्या लपवणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक! मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण)

याआधीही झाला होता गुन्हा दाखल

याआधी MIMER रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या बिलाचे पैसे देणे बाकी असल्याने, रुग्णाचा मृतदेह तीन दिवसांसाठी शवागृहात लपवून ठेवल्याची माहिती मिळत आहे. तेव्हा मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता रुग्णाच्या आत्महत्येला देखील रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले जात असल्याने, रुग्णालयातील इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here