राज्यात आज कोरोनाच्या नव्या नोंदणीत भलतीच घट दिसून आली. शनिवारी राज्यभरात कोरोनाच्या नव्या नोंदणीत केवळ 97 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 3 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येची निच्चांकी नोंद आढळली. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब बनली आहे. कालपर्यंतचे कोरोनाचे रौद्ररूप आता ब-यापैकी कमी झाले, आता तर त्याचे राज्यामधूनच अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मृत्युदर 1.82 टक्के
आज 251 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.10 टक्क्यांवर नोंदवले जात आहे. शनिवारी केवळ एका रुग्णाने उपचारादरम्यान जीव गमावला. साताऱ्यात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आता मृत्युदर 1.82 टक्के नोंदवला जात आहे. राज्यात आता 1 हजार 525 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 77 लाख 72 हजार 300 रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. 77 लाख 23 हजार 5 रुग्णांना कोरोना उपचारातून यशस्वीरित्या बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community