मुंबईकरांनो, व्हा अलर्ट! कोरोना मारतोय लॉकडाऊनला डोळा

120

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाने हातपाय पसरु लागला असून वाढत्या कोरोनाचा आकडा हा लॉकडाऊनला डोळा मारु लागला आहे. मुंबईत मागील सहा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली असून जर अशाच प्रकारे रुग्णांची संख्या वाढू लागल्यास तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लवकरच लॉकडाऊन करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

९२२ बाधित रुग्ण आढळून आले

मुंबईमध्ये रविवारी ९२२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. रविवारी, ३४ हजार ८१९ लोकांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ९२२ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयांमध्ये ज्याप्रकारे कोरोना बाधित रुग्णांची वाढत्या रुग्ण संख्येच्या आलेखानुसारच ही संख्या वाढू लागल्याने एकप्रकारे मुंबईकरांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.

सक्रिय रुग्णांची ४ हजार २९६ एवढी संख्या

मुंबईत रविवारी दिवसभरात ३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या ही ४ हजार २९६ एवढी आहे. विशेष म्हणाजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा १,१३९ दिवस एवढा आहे, जो दर २० डिसेंबर रोजी २ हजार ९५ दिवस एवढा होता. अर्थात हा रुपटीच्या दिवसाचा दर निम्म्या दिवसांवर आला आहे. तर सक्रिय सीलबंद इमारती या २२ असून एकही झोपडपट्टी, चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये नाही.

(हेही वाचा मुंबईतील ९ लाख मुलांच्या लसीकरणासाठीही महापालिका सज्ज)

मागील दहा दिवसांमधील बाधित रुग्णांची आकडेवारी

  • २६ डिसेंबर २१ : चाचण्या -३४,८१९, बाधित रुग्ण – ९२२, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -३२६
  • २५डिसेंबर २१ : चाचण्या -४२,४२७ बाधित रुग्ण – ७५७, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२८०
  • २४ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,४७२, बाधित रुग्ण – ६८३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२६७
  • २३ डिसेंबर २१ : चाचण्या -३९,४२३, बाधित रुग्ण – ६०३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२०७
  • २२ डिसेंबर २१ : चाचण्या -४५,०१४, बाधित रुग्ण – ४०९, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • २१ डिसेंबर २१ : चाचण्या – ३७,९७३, बाधित रुग्ण – ३२७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७
  • २० डिसेंबर २१ : चाचण्या -३०,६७२, बाधित रुग्ण – २०४, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • १९ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,८५७, बाधित रुग्ण – ३३६, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -२०१
  • १८डिसेंबर २१ : चाचण्या -५१,१७१, बाधित रुग्ण – २८३, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२७५
  • १७ डिसेंबर २१ : चाचण्या -५१,२६६ बाधित रुग्ण – २९५, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.