मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण : ६,१२३ रुग्ण, १२ मृत्यू!

मागील सात ते आठ दिवसांपासून तीन हजारांवरुन दैनंदिन रुग्णांची संख्या सहा हजारांवर जावून पोहोचलेली असतानाही मुंबई महापालिकेच्यावतीने अद्यापही कोणत्याही प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले नाहीत. 

78
मुंबईत कोरोनाच्या बाधित रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढतच जात असून शनिवारी दिवसभरात तब्बल ६,१२३ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी पाचशे ते दीड हजारांनी रुग्णांमध्ये वाढ होवून रुग्ण संख्येचा आकडा फुगत चालला आहे. परंतु रुग्ण संख्या  मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही मुंबईतील वाढत्या गर्दीवर निर्बंध आणण्यात मुंबई महापालिकेला अपयश येत आहे.

एका दिवसात १० टक्क्यांनी वाढली रुग्ण संख्या!

मुंबईत शुक्रवारी, २६ मार्च रोजी ५,५१३ कोरोनाच्या रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी ६ हजार १२३ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात २ हजार २९४ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ४१ हजार ६०९  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांपैकी ९ रुग्ण हे दिर्घकालिन आजारी होते. यातील ०८ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते, तर ०४ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ११ हजार ६४१ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४८ हजार ७५ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

५५१ इमारती या शनिवारपर्यंत सील!
लक्षणे नसलेल्या व सौम्य उपचार असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या सीसीसी टू मध्ये २,५७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर जास्त व गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेले तसेच दिर्घकालिन आजार असलेल्या १२ हजार ३३६ रुग्णांवर डिसीएच, डिसीएचसी बेड आदी ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर झोपडपट्टी व चाळी अशी एकूण ५३ कंटेंटमेंट झोन शनिवार पर्यंत होते, तर ५५१ इमारती या शनिवारपर्यंत सील करण्यात आल्या होत्या. मागील सात ते आठ दिवसांपासून तीन हजारांवरुन दैनदिन रुग्णांची संख्या सहा हजारांवर जावून पोहोचलेली असतानाही मुंबई महापालिकेच्यावतीने अद्यापही कोणत्याही प्रकारचे निर्बंध जारी करण्यात आलेले नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.