मुंबईतील रुग्णसंख्या तीनशेच्या खाली!

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,३२४ दिवसांवर पोहचला.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचा आकडा कमी होत चालला असून चारशेच्या खाली आलेली ही रुग्णसंख्या सोमवारी चक्क तीनशेच्या खाली उतरली. सोमवारी दिवसभरात २९९ नवीन रुग्ण आढळून आले असून ८ रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. रविवारी ३१ हजार ६०१ कोविड चाचण्या केल्यानंतरही ३६२ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी २४ हजार ९८९ कोविड चाचण्या केल्यानंतरही ही रुग्ण संख्या २९९ एवढी आढळून आली. तर संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी ५ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरु होते.

सोमवारी २९९ नवीन रुग्णांची नोंद

रविवारी जिथे ३६२ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी २९९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ५०१ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर दिवसभरात ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ०६ रुग्ण हे दीर्घकालिन आजारांचे होते. तर यामध्ये ६ पुरुष आणि २ महिला रुग्णांचा समावेश होता. यामध्ये एका मृत रुग्णांचे वय हे चाळीशीच्या आतमध्ये आहे. तर ६ रुग्णांचे वय हे ६० वर्षांच्या पुढील आहे. एक रुग्ण हा ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहे.

(हेही वाचा : कोकण महापुरात तेव्हा कोकणचे ‘ते’ नेते होते घरात!)

रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,३२४ दिवस

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,३२४ दिवस एवढा आहे. तर सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या ३ एवढी आहे तर इमारतींची संख्या ६० एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here