राज्यात पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण; ३,०१६ सक्रिय रुग्ण 

89

कोरोनाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३,०१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत १८४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के इतके आहे. राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा, गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात ५२३ ऑक्सिजन प्लांट असून ५५२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. ३७० एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टँक, ५६ हजार ५५१ जम्बो सिलिंडर, २० हजार छोटे सिलिंडर्स, १ हजार ड्युरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी १ हजार ५८८ कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा ५१ हजार ३६५, ऑक्सिजन बेड ४९ हजार ३९६, आयसीयू बेड १४ हजार ३९५, तर व्हेंटिलेटर बेड ९ हजार २३६ आहेत.

(हेही वाचा राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर प्रथमच बोलले अमित शाह, म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.