व्होकार्ड रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णाची लूट! कपडे काढून केले आंदोलन!

या रुग्णालयात पंधरा ते वीस दिवसांत एका परिवाराचे चार जण दाखल असताना दोन जण दगावले. तसेच त्यांच्या वैद्यकीय विमा पॉलिसीमधून हॉस्पिटलने पैसेसुद्धा वसूल केले.

110

नाशिकमधील गरीब कुटुंबातील एका अभियांत्रिकी तरुणाच्या कुटुंबातील ४ जणांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील २ जण दगावले. या सर्वांचे मिळून व्होकार्ड रुग्णालयाने वाढीव बिल बनवले. त्या तरुणाने कर्ज काढून बिल भरले, मात्र ही रुग्णालयाकडून लूट होत आहे, हे लक्षात आले, तसेच डिपॉझिट रक्कम १ लाख ५० हजार रुपये परत करावे, अशी मागणी होती. या मागणीसाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’ चळवळीचे जितेंद्र भावे यांनी थेट रुग्णालयाच्या बाहेर कपडे काढून पैसे परत करण्यासाठी आंदोलन केले.

एका परिवाराचे चार जण दाखल, दोन जण दगावले!

मंगळवारी,  25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचे जितेंद्र भावे व त्यांच्या सहकार्याने व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये जादा बिलाच्या विरोधात कपडे काढून आंदोलन केले. या रुग्णालयात पंधरा ते वीस दिवसांत एका परिवाराचे चार जण दाखल असताना दोन जण दगावले. तसेच त्यांच्या वैद्यकीय विमा पॉलिसीमधून हॉस्पिटलने पैसेसुद्धा वसूल केले. त्यासाठी ॲडव्हान्ससुद्धा घेतला.

(हेही वाचा : किरकोळ विक्रेत्यांनाही आर्थिक मदत करणार का? उच्च न्यायालयाकडून विचारणा )

रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल!

रुग्णांचे नातेवाईक हतबल झाल्याने ‘ऑपरेशन हॉस्पिटल’चे जितेंद्र भावे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रुग्णालयामध्ये बिल कमी करावे आणि रुग्णालयाने अधिकची रकम परत करावी, अशी मागणी केली. परंतु रुग्णालय प्रशासन ऐकत नसल्याने जितेंद्र भावे व रुग्णाचे नातेवाईक यांनी फेसबुक लाईव्ह करून कपडे काढून आंदोलन केले. यावेळी रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. फेसबुक लाईव्हमुळे अवघ्या नाशिक शहरात खळबळ उडाली. घटनास्थळी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आले आणि त्यांनी हा वाद मिटवला. यावेळी जितेंद्र भावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.