कस्तुरबा रुग्णालयात वायू गळती! कोरोना रुग्णाची हलवाहलवी!

या घटनेनंतर सामान्य स्थितीतील रुग्णांना पायी जावे लागले, तर काहींना स्ट्रेचरवरून दुसरीकडे हलवण्यात आले. सुदैवाने यात कुणाची जीवित हानी झाली नाही.

86

शनिवारी, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३४ वाजता मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील एका इमारतीत एलपीजी गॅसची गळती झाली. त्यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना अन्य इमारतीत हलवताना रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली.

जीवित हानी नाही!

कस्तुरबा रुग्णालयात शनिवार, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ३४ मिनिटाने अचानक तेथील एलपीजी वायूची गळती झाली. त्यावेळी रुग्णालयात एकच खळबळ उडाली. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यामध्ये काही रुग्ण सामान्य स्थितीत होते, तर काही जणांना सलाईन लावलेले होते. अशा वेळी ही घटना घडल्यावर रुग्णालय प्रशासन तात्काळ सक्रिय झाले आणि त्यांनी त्या इमारतीत दाखल केलेल्या रुग्णांना तात्काळ दुसऱ्या इमारतीत हलवले. त्यावेळी सामान्य स्थितीतील रुग्णांना पायी जावे लागले, तर काहींना स्ट्रेचरवरून दुसरीकडे हलवण्यात आले. सुदैवाने यात कुणाची जीवित हानी झाली नाही.

(हेही वाचा : होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!)

कोविड रुग्णालयात वायू गळतीच्या घटना सुरूच!

मागील वर्षभरात कोविड केंद्र आणि कोविड रुग्णालयात वायू गळतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेक जीवितहानी झाली आहे. तरीही तेथील सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क बनले नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा कस्तुरबा रुग्णालयातील वायू गळतीमुळे आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.