कोविड चाचण्या वाढल्यानंतरही रुग्णसंख्या साडेपाचशेपर्यंतच

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ९४८ दिवसांएवढा आहे.

74

मुंबईतील कोविडबाधित रुग्णसंख्येने बुधवारी ६३५ पर्यंत मजल मारलेली असतानाच गुरुवारी, १५ जुलै रोजी हा आकडा काहीसा खाली येत दिवसभरात ५४५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे दिवसभरात ३६ हजार ५६८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर हे ५४५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी ३५ हजार ९६८ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ६३५ रुग्ण आढळून आले हेाते. त्यामुळे कोविड चाचण्या वाढवल्यानंतरही रुग्णसंख्या साडेपाचशेवर आल्याने एकप्रकारे मुंबईकरांसाठी समाधानाची बाब आहे.

गुरुवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे!

मुंबईमध्ये गुरुवारी ५४५ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर गुरुवारपर्यंत ७,०१२ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. तर बुधवारी जिथे मृत्यूचा आकडा १० वर एवढा होता, तिथे गुरुवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या १३ रुग्णांपैंकी ०८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ०७ रुग्ण हे पुरुष तर ०६ रुग्ण या महिला होत्या. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये १ रुग्ण हा चाळीशीच्या आतील आहेत. तर ८ रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरीत ४ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.

(हेही वाचा : सामांन्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? पटोलेंचा फडणवीसांना सवाल!)

रुग्ण दुप्पटीचा दर हा ९४८ दिवसांएवढा!

मुंबईतील रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ९६ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९४८ दिवसांएवढा आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रीय कंटेन्मेंटची संख्या सातवर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ७३ वर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.