मुंबईत पुन्हा वाढतेय रुग्ण संख्या!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२८ दिवसांवर आला आहे.

85

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा पारा चढला असून मंगळवारी जिथे ५७० रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ८६३ रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांच्या मृत्यूचा आकडा जिथे १५ च्या आतमध्ये होता, तिथे बुधवारी चक्क २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आणि मृत्यूचाही आकडा वाढल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांचा बेशिस्त आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवून जनतेला पुन्हा घरात कोंडण्यासाठी सरकारसाठी वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, सरकारने उठवलेल्या निर्बंधानंतर आपण बेजबाबदारपणे न वागता जर कोविड नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना केल्यास संभाव्य तिसऱ्या लाटेपासून वाचता येईल आणि ही लाट लांबणीवर टाकता येवू शकते.

(हेही वाचा : महामंडळावरुन ठाकरे सरकारमध्ये ठिणगी, काँग्रेसला हवे सिडकोचे अध्यक्षपद)

दिवसभरात २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद!

मंगळवारी, ३२ हजार ३०७ चाचण्या करण्यात आल्यानंतर जिथे ५७० रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ३७ हजार ९०५ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या ८६३ एवढी आढळून आली आहे. तर दिवसभरात ७११ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर बुधवारपर्यंत १४ हजार ५७७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. दिवसभरात २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामध्ये १७ मृत रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर मृतांमध्ये १२ पुरुष आणि ११ महिला रुग्णांचा समावेश होता. या मृत रुग्णांपैकी २ रुग्ण हे ४० वर्षांखालील वयोगटातील होते, तर १२ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते आणि उर्वरीत ०९ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२८ दिवसांवर

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२८ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८८ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या १२ एवढी आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.