मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या आत नियंत्रणात राखण्यात यश येत असून सोमवारी दिवसभरात ७,३८१ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा आकडा खालच्या दिशेने सरकला जात असला तरी मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे.
८,५८३ रुग्ण बरे होवून घरी परतले!
मुंबईत सोमवारी दिवसभरात ७,३८१ रुग्ण आढळून आले, तर ८,५८३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आतापर्यंत ८६ हजार ४१० सक्रिय रुग्ण म्हणजे त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात ३६ हजार ५५६ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३२ पुरुष आणि २५ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर यातील २० रुग्ण हे दिर्घकालिन आजाराचे होते. यातील ४१ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत.
(हेही वाचा : 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार लस… केंद्र सरकारचा मोठा निर्णय!)
कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या शंभरी पार
मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८३ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ४७ दिवसांवर आला आहे. तर कोविड वाढीचा दर १.४६ टक्क्यांवर आला आहे. जास्त लक्षणे, गंभीर रुग्ण तसेच दिर्घकालिन आजाराच्या रुग्णांवर विविध ठिकाणच्या महापालिका व खासगी अशा डिसीएच आणि डिसीएचसीमध्ये उपचार केले जात आहे. यामध्ये ठिकाणी २० हजार ६४१ बेडवर रुग्ण दाखल आहेत. याशिवाय आयसीयूमध्ये २,७६२ व व्हेंटीलेटरवर १,४१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये सिलबंद इमारतींची संख्या सोमवारपर्यंत १,१७१ आहे. पण कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या शंभरी पार झाली आहे. सोमवारपर्यंत ही संख्या १०६ एवढी होती
Join Our WhatsApp Community