मुंबईतील कोरोनाचा पारा उतरला, मृत्यूचा आकडा एकेरी!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर आला आहे.

77

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा आकडा मागील काही दिवसांपासून सातशे पार झालेला असतानाच सोमवारी दिवसभरात पुन्हा एकदा कोरोनाचा पारा उतरलेला पाहायला मिळाला. सोमवारी दिवसरात ५२१ रुग्ण आढळून आले. दिवसभरात ६८५ रुग्ण बरे होवू घरी परतले. विशेष म्हणजे मृत्यूचा आकडा एकेरी झाला आहे. दिवसभरात ७ रुग्णांच्या मृत्यू झाला.

सोमवारपर्यंत १४ हजार ६३७ सक्रिय रुग्ण होते!

सोमवारी दिवसभरात २६ हजार २८६ चाचण्यात करण्यात आल्या. रविवारी जिथे ७३३ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी ५२१ रुग्ण आढळून आले. तर सोमवारपर्यंत १४ हजार ६३७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. दिवसभरात केवळ ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामध्ये ०४ मृत रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर मृतांमध्ये ०५ पुरुष आणि ०२ महिला रुग्णांचा समावेश होता. तर ४ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते आणि उर्वरीत ३ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

(हेही वाचा : योग संस्कृतीला निधर्मीयतेचा मुलामा देण्याचा अभिषेक मनू सिंघवींचा घृणास्पद प्रयत्न! )

रुग्ण दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर आला!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या १६एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.