शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या आतच स्थिर राहिला. शुक्रवारी जिथे दिवसभरात ३,९२५ रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी ३,९०८ रुग्ण आढळून आले. तर शुक्रवारी जिथे ८९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शनिवारी ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण आकडा मागील चार दिवसांपासून चार हजारांच्या आत स्थिर राहिला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमधील वाढ कायमच आहे. वाढणारे आकडे मनातील भीती वाढवणारे ठरत आहेत.
४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा ३१!
शनिवारी दिवसभरात एकूण ५१ हजार ३१८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. मात्र दिवसभरात ९० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यातील ५३ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ५७ पुरुष व ३३ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ९ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ५० रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा ३१ एवढा होता. शनिवारी रुग्ण दुपटीचा दर ९१ दिवसांवर आला होता. रुग्णांचा दर हा ८९ टक्के एवढा होता. तर कोविड वाढीचा दर हा ०.७० टक्के होता. शनिवारपर्यंत जास्त लक्षणे असलेल्या व चिंताजनक झालेल्या २१ हजार ८५० रुग्णांवर विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते.
(हेही वाचा : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लस!)
सील केलेल्या इमारतींची संख्या घटली!
मुंबईतील बुधवारपासून सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या १,११४ वरून शनिावरी ही संख्या ९७९ एवढी झाली आहे. त्यामुळे सिल करण्यात आलेल्या इमारतींची संख्या घटलेली पाहायला मिळत आहे. तर काही दिवसांपासून कंटेन्मेंट करण्यात आलेल्या झोपटपट्टी व चाळींची संख्या कंटेन्मेंट मुक्त होत असून ११४ वरून हा आकडा आता १११वर आला आहे.
Join Our WhatsApp Community