मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५००च्या दिशेने! 

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ६७२ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील सोमवारी, १४ जून रोजी कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५२९ झाली आहे, तर दिवसभरात ७२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात १९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

अशी आहे रुग्ण संख्या!

रविवारी मुंबईत संपूर्ण दिवसभरात ७०० रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी ५२९ रुग्ण आढळून आले आहेत. तर संपूर्ण दिवसभरात २० हजार १३३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सोमवारपर्यंत १५ हजार ५५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रविवारी जिथे १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे सोमवारीही १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये ११ पुरुष आणि ८ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली २ रुग्णांचा समावेश असून, ६० वर्षांवरील १३ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ६ एवढी आहे.

(हेही वाचा : उद्रेक झाला तर सरकार जबाबदार! उदयनराजे यांचा इशारा)

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ६७२ दिवसांवर!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ६७२ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ७७ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही २१ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here