कोरोना निर्बंधातून मुंबई सुटणार, पण लोकलचे काय?

टास्क फोर्सची बैठक पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील मुंबईसह २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा निर्णय झालेला नाही, त्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टास्क फोर्सची बैठक पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ती फाईल पाठवली जाणार आहे, त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक-दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असे टोपे म्हणाले. राज्यातील ११ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून कमी झालेली नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील.

(हेही वाचा : सत्ताधाऱ्यांना खुर्ची बोचायला लागली! फडणवीसांनी सांगितले सरकारचे भवितव्य)

लोकलबाबत अद्याप निर्णय नाही!

मुंबईत सिनेमागृह आणि मॉलमधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, त्यावर निर्णय झाला नाही. चर्चेच्या वेळी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, असा विषय चर्चेला आला होता. मात्र असे प्रवासी शोधण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागणार नाही, तसेच त्यांणारही त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे, म्हणून अद्याप तरी यावर निर्णय झाला नाही, असेही टोपे म्हणाले.

या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल

परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुबई, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here