मुंबईत कोरोनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर!

रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,४३४ दिवस एवढा झाला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचा आकडा चारशेच्या खाली आलेला असून शुक्रवारी, ३० जुलै रोजी दिवसभरात ३२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३६६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईकरांना सर्वात अधिक दिलासा देणारे वृत्त म्हणजे ३२ हजार २८५ कोविड चाचणी केल्यानंतर ३२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकप्रकारे मुंबईतील कोविडची दुसरी लाट संपुष्टात येण्याच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

७ रुग्णांचा मृत्यू!

संपूर्ण दिवसभरात ५ हजार ८२ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालये व सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात ०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ०५ रुग्ण हे दीर्घकालिन आजारांचे होते. तर यामध्ये ५ पुरुष आणि २ महिला रुग्णांचा समावेश होता. तर ४ रुग्णांचे वय हे ६० वर्षांच्या पुढील आहे. ०३ रुग्ण हा ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहे.

(हेही वाचा : भाजपच्या भीतीने महापालिकेत विरोधी पक्षाची धार बोथट!)

रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,४३४ दिवस!

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १,४३४ दिवस एवढा आहे. तर सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या ३ एवढी आहे तर इमारतींची संख्या ५५ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here