कोरोनाचा साईड इफेक्ट: ९७ टक्के जनता झाली गरीब! 

कोरोनाच्या आधी देशात ४०.३५ कोटी नोकऱ्या होत्या. पहिल्या लाटेनंतर डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत नोकऱ्यांची संख्या ४० कोटी झाली. यात ३५ लाख नोकऱ्या संपुष्टात आल्या.

81

मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. व्यवहार ठप्प झाले. त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९७ टक्के जनता आणखी गरीब झाली आहे, असा धक्कादायक अहवाल केंद्रीय संस्थेने दिला आहे.

दुसऱ्या लाटेत १४.७३ टक्के नागरिकांनी गमावला रोजगार!

सेंट्रल फॉर इंडियन इकॉनॉमी या संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात १४.७३ टक्के नागरिकांना रोजगार गमवावा लागला आहे. ते सध्या बेरोजगार बनले आहेत. शहरी क्षेत्रात बेरोजगारीचा दर १७ टक्के, तर ग्रामीण भागात १४ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९७ टक्के जनता ही अधिक गरीब बनली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा : पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल, पण…! काय म्हणाले संजय राऊत? )

पहिल्या लाटेनंतर ३५ लाख नोकऱ्या संपुष्टात!

भारताला कोरोनाचा पहिला झटका हा एप्रिल २०२० मध्ये बसला होता. त्यावेळी १२.६ कोटी जनतेने रोजगार गमावला होता. त्यामध्ये ९ कोटी श्रमिक जनता होती. सीएमआयइच्या सर्वेनुसार कोरोनाच्या आधी देशात ४०.३५ कोटी नोकऱ्या होत्या. पहिल्या लाटेनंतर डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत नोकऱ्यांची संख्या ४० कोटी झाली. यात ३५ लाख नोकऱ्या संपुष्टात आल्या होत्या.

५५ टक्के नागरिकांच्या मिळकतीत घट!

कोरोनाच्या लाटेत मागील दीड वर्षात केवळ ३ टक्के लोकांच्या मिळकतीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले, तर ५५ टक्के नागरिकांनी त्यांच्या मिळकतीमध्ये घट झाल्याचे स्पष्ट केले. इतरांच्या मिळकतीमध्ये काहीही फरक पडला नसल्याचे स्पष्ट झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.