कोरोनामुळे आधीच सर्वांना धडकी भरली आहे त्यात पुन्हा एकदा कोरोनाने धाकधूक वाढवली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याच समोर आलं आहे. कोविड-१९ चा सबव्हेरियंट JN.1 चे पहिल प्रकरण केरळ मध्ये आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयने याबाबत माहिती दिली. तसेच कोरोना ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.(JN.1 case)
मीडिया रिपोर्टस् नुसार १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याच पाहायला मिळालं होत. महिलेने सांगितले की तिला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची सौम्य लक्षणं आहेत आणि ती COVID-19 मधून बरी झाली आहे.मधून बरी झाली आहे. (JN.1 case)
(हेही वाचा : Overhead Wire Snaps: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल)
एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार केरळचे आमदार केपी मोहनन यांनी शनिवारी कन्नूर येथील पनूर नगरपालिका रुग्णालयात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली. केरळमधील कन्नूर जिल्हयातील पनूर नगरपालिकेत प्रभाग -१ निवली येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. अब्दुल्ला असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ८० वर्षांचे होते. या घटनेनंतर परिसरात कोविड प्रतिबंध्यात्मक योजना राबविल्या जात आहेत. तसेच आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली. आधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलेंडर,आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहणायचे निर्देश दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community