मुंबईत सोमवारी, २१ जून रोजी दिवसभरात जिथे ५२१ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी ५७० रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईकरांसाठी सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे दिवसभरात आजवरच्या सरासरी २८ ते ३० हजार कोविड चाचण्यांच्या तुलनेत मंगळवारी दिवसभरात ३२ हजार ३०७ चाचण्यात करण्यात आल्या. त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतरही दिवसभरात ५७० रुग्ण आढळल्याने हा आजार बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आल्याचे स्पष्ट होते. तर सोमवारी सिंगलवर आलेला मृत्यूचा आकडा पुन्हा डबल होवून १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
३२ हजार ३०७ चाचण्या करण्यात आल्या!
सोमवारी दिवसभरात २६ हजार २८६ चाचण्या करण्यात आल्या होत्या आणि ५२१ रुग्ण आढळून आले, तर मंगळवारी ३२ हजार ३०७ चाचण्या करण्यात आल्या आणि ५७० रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ७४२ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर मंगळवारपर्यंत १४ हजार ४५३ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. यामध्ये ०६ मृत रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर मृतांमध्ये ०५ पुरुष आणि ०५ महिला रुग्णांचा समावेश होता. या मृत रुग्णांपैकी १ रुग्ण हा ४० वर्षांखालील वयोगटातील आहे, तर ०८ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते आणि उर्वरीत ०१ मृत रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.
(हेही वाचा : दक्षिण मुंबईतील ‘या’ कोविड सेंटरमध्ये वाढणार ७०० ऑक्सिजन खाटा)
रुग्ण दुपटीचा दर हा ७२२ दिवसांवर आला!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२२ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ११एवढी आहे.
Join Our WhatsApp Community