पुण्यात निर्बंध कायम! व्यापारी उतरले रस्त्यावर!

युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन व व्यापारी महासंघाच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक, डेक्कन येथे सरकारच्या विरोधात मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी घंटानाद व थाळी आंदोलन केले.

राज्य सरकारने सोमवारी, २ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाचा आढावा घेत अनलॉक प्रक्रिया सुरु केली. त्यानुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले आहेत, तर ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून पुण्यातील व्यापारी आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी पुण्याच्या रस्त्यावर घंटानाद केला.

आमच्या सरकारकडे दोन मागण्या आहेत. रेस्टॉरंट उद्योगाची वेळ संध्याकाळी ४ वाजल्यापासून बदलण्याची आवश्यकता आहे. उत्पादन शुल्कात सवलत हवी आहे, आम्हाला एमएसईबी बिलांवर पाणी कर आणि मालमत्ता करात सवलत हवी आहे. कारण गुजरात, केरळ, कर्नाटकच्या इतर राज्यांनी आधीच सवलत दिलेली आहे. जेव्हा आम्ही आमचा व्यवसाय दीड वर्षांसाठी बंद होता, तेव्हा आम्ही कर आणि फी भरत राहतो. आम्हाला १२ ते ३ आणि ६ ते ११.३० वेळेत द्या.
–  समीर शेट्टी, खजिनदार, युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन

(हेही वाचा : सावित्रीवरील ‘त्या’ पुलाबाबत तेव्हाही  निष्काळजीपणा, दुर्घटनेनंतर चौकशीतही बेपर्वाईपणा!)

घंटा व थाळी नाद आंदोलन!

युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन व व्यापारी महासंघाच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक, डेक्कन येथे सरकारच्या विरोधात मंगळवारी, ३ ऑगस्ट रोजी घंटानाद व थाळी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी रसत्यावर उतरले होते. हॉटेल व्यावसायिक सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे संदीप नारंग अध्यक्ष म्हणाले की, आज आम्ही करत असलेले हे आंदोलन आणि घंटानाद हे महाराष्ट्र सरकारला त्याच्या खोल झोपेतून जागृत करण्यासाठी आहे. फूड हॉटेल्स रेस्टॉरंट बार परमिट रूम उद्योग गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. आजही आम्हाला संध्याकाळी ४ वाजेसाठी दिलेला वेळ ही जगातील प्रत्येकाला माहित आहे की संध्याकाळी ४ वाजता कोणीही ड्रिंक आणि डिनरसाठी बाहेर येत नाही. त्या आधी संध्याकाळी ४ वाजताची वेळ लॉकडाऊन आणि आमच्या उद्योगासाठी संपूर्ण शटडाउन सारखे चांगले आहे. आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here