शनिवारी फक्त महिलांसाठी लसीकरणाचा ‘जागर’

फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नवरात्रोत्सवात देवीचा जागर सुरू असून येत्या शनिवारी म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी लसीकरण सत्र राबवून हा जागर केला जाणार आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत हे लसीकरण आहे. त्यामुळे थेट लसीकरण केंद्रावर येवून महिलांना पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र होणार आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आले होते. त्यात प्रत्येक वेळी सव्वा लाख महिलांनी भाग घेतला होता. त्यामुळे शनिवारी, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जात आहे.

(हेही वाचा : उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा मी सीनियर!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here