चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने, राज्यात अद्याप मास्कची सक्ती केली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांकडून भाविकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर, तुळजापूर, वणी, माहूरगड या शक्तिपीठांबरोबरच पंढरपूर, शिर्डी या देवस्थान समितीने भाविकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. भाविकही त्याला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. विनामास्क येणा-यांना थांबवले जात आहे.
बूस्टरसाठी नेजल व्हॅक्सिनला मंजुरी
भारत बायोटेकच्या इंट्रोनेजल व्हॅक्सिनला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना बूस्टर म्हणून ही लस घेता येईल. लसीकरणसाठी को- विन वर नोंदणी लवकरच सुरु होऊ शकते. या लसीसाठी सुईंचा वापर केला जाणार नाही. ही लस नाकातून दिली जाणार आहे, तसेच खासगी हाॅस्पिटलमध्येही ती उपलब्ध असणार आहे.
( हेही वाचा: CBI ची मोठी कारवाई; ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक )
लग्न, समारंभ, सभा, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा
लग्न, समारंभ, राजकीय सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएनशने केले आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रिकाॅशन डोस घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असे आयएमएने म्हटले. कोरोना रुग्ण वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारही उपाय करत आहे.
Join Our WhatsApp Community