कोरोना रुग्णांच्या दैनंदिन नोंदणीत ३७.४९ टक्के घट झाल्याची माहिती सोमवारी आरोग्य विभागाने दिली. नोव्हेंबर महिन्यात दर आठवड्याला नव्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये ही घट दिसून आल्याचे सांगण्यात आले. पुण्यात ओमायक्रॉनच्या बी.क्यू.११ या विषाणूचा नवा रुग्ण सापडला. मात्र घरगुती विलगीकरणात रुग्ण बरा झाला आहे.
( हेही वाचा : ‘बालकमंत्र्या’पासून सुटका, तीन वर्षांनंतर मुंबईला मिळाले खरे ‘पालकमंत्री’; अमित साटम यांची खरमरीत टीका)
पुण्यातील १९ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात बी.क्यू.११ हा नवा विषाणू आढळला. बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात या तरुणाला बी.क्यू.११ चे निदान झाले. तरुणाने आयलँड देशात आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. त्याला सौम्य स्वरुपाचा आजार होता. त्यामुळे हा रुग्ण बरा झाला. सोमवारी राज्यात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्क्यांवर नोंदवले जात आहे.
कोरोनाचा साप्ताहिक आढावा –
- या आठवड्यामध्ये राज्यात कोरोनामुळे होणा-या मृत्यूंची संख्या ७वरअसून, मागील चार आठवड्यांमध्ये मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली नाही.
- या आठवड्यामध्ये प्रयोगशाळा चाचणीमध्ये पॉझिटीव्हीटी दर १.५७ टक्क्यांवरुन १.१५ टक्क्यांवर घटला आहे.
- कोल्हापूर, अकोला, वाशिम, पुणे या जिल्ह्यांत साप्ताहिक पॉझिटीव्ही दर २पेक्षा जास्त आहे.
- रुग्णालयामध्ये तसेच अतिदक्षता विभागात उपचारांसाठी भरती होणा-या रुग्णांमध्ये नियमितपणे घट होत आहे. या आठवड्यात दैनंदिन रुग्णांपैकी केवळ १.९९ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल झाले आहेत.