मृत्यूचा आकडा पुढे सरकतोय, बुधवारी ६२ मृत्यू!

आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ८४ हजार ७४३ झाली असून दिवसभरात ४७ हजार २७० रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

83

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या आत नियंत्रणात राखण्यात यश येत असून बुधवारी दिवसभरात ७,६८४ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत रुग्ण आकडा दुपटीच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे. मागील चार दिवसांपासून दिवसाला सरासरी ५० रुग्णांचा मृत्यू होत असतानाच मंगळवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु बुधवारी हा आकडा ६२ इतका झाला.

दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला!

मुंबईत मंगळवारी दिवसभरात जिथे ७,३८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ७,६८४ आढळून आले. तर ६,७९० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आतापर्यंत ८४ हजार ७४३ सक्रिय रुग्ण म्हणजे त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात ४७ हजार २७० रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३३ पुरुष आणि २९ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर यातील ४० रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यातील ३८ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत.

(हेही वाचा : मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ३५ आयसीयू बेड वाढणार!)

२,८२३ आयसीयू, तर व्हेंटीलेटरवर १,४४७ रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईतील रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८४ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ४८ दिवसांवर आला आहे. तर कोविड वाढीचा दर १.४२ टक्क्यांवर आला आहे. जास्त लक्षणे, गंभीर रुग्ण तसेच दीर्घकालीन आजाराच्या रुग्णांवर विविध ठिकाणच्या महापालिका व खासगी अशा डिसीएच आणि डिसीएचसीमध्ये उपचार केले जात आहे. या ठिकाणी २१ हजार २८३ बेडवर रुग्ण दाखल आहेत. याशिवाय आयसीयूमध्ये २,८२३ व व्हेंटीलेटरवर १,४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये सिलबंद इमारतींची संख्या सोमवारपर्यंत १,१९८ आहे. पण कंटेन्मेंट झोन जाहीर केलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या शंभरी पार झाली आहे. बुधवारपर्यंत ही संख्या ११४ एवढी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.