कोरोनाला हरवा आणि मिळवा तब्बल 50 लाख रूपये!

देशात कोरोनाच्या तिस-या लाटेने धडक दिली आहे. येत्या दिवसागणिक आता कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठू लागली आहे. त्यामुळे सरकारपुढे आता कोरोनाच्या रुग्ण वाढीवर निर्बंध आणण्याचे मोठे आव्हान आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एका स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना मुक्त गाव’ असे या स्पर्धेचे नाव असून, पुणे जिल्ह्यासाठी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात 10 जानेवारीपासून सुरू झाली असून 15 मार्चपर्यंत चालणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पर्धेचे स्पष्टीकरण देण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हा आहे उद्देश

पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग कोविडमुक्त ठेवण्यासाठी, पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामीण भागात  कोविड व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात आल्याचे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्याला संबंधित ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी दिला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे सर्व ग्रामपंचायतींवर कोविडचे योग्य व्यवस्थापन आणि जनजागृती व्हावी हा उद्देश असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

( हेही वाचा :भुजबळांच्या अडचणीत वाढ, अंजली दमानिया ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार! )

50 लाखांचे मिळणार बक्षीस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here