काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ मागील सत्य?

२९ जून रोजी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे मृताच्या नातलगांना कळवले जाते, नातलग मृताचा चेहरा न पाहता अंत्यसंस्कार करतात, वर्षभरानंतर एक व्हिडिओ व्हायरल होतो, तो पाहून नातलगांना का धक्क्का बसला. 

एका व्यक्तीला मृत समजून पीपीई किटमध्ये गुंडाळून त्याला शववाहिनीतून स्मशानात आणण्यात येते, त्यानंतर मृत समजून पीपीई किटमध्ये गुंडाळलेल्या व्यक्तीच्या पीपीई किटची अर्धवट चैन उघडली असते, त्यात मृत समजून गुंडाळलेली व्यक्ती चक्क  हालचाल करून हलकेसे आपले डोळे उघडते. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये काढण्यात आलेल्या व्हिडीओत कैद झाला आहे. त्यानंतर मात्र त्या व्यक्तीचे काय झाले हे कुणालाच अद्याप कळले नाही.

२९ जून रोजी रामचरण गुप्तांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने कळवले! 

मुंबईमध्ये हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे, ती व्यक्ती कोण आहे याबाबत मात्र कुठलीही माहिती कळत नव्हती. मुंबईतील एका राजकीय पक्षांच्या नेत्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मुंबई महानगरपालिकेला जवाबदार धरून बदनामी केल्याप्रकरणी त्या राजकीय नेत्यावर मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चेंबूर येथे राहणाऱ्या विजय गुप्ता या व्यक्तीने या व्हिडियोमधील व्यक्ती माझे वडील असल्याचा दावा केला आहे. २७ जून २०२० मध्ये माझे वडील रामचरण गुप्ता यांना निमोनिया झाला होता, त्यांना चेंबूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वांद्र्याच्या भाभा रुग्नालयात शिफ्ट करण्यात आले होते. २९ जून रोजी आम्हाला रुग्णालयातून फोन करून तुमचा रुग्ण दगावला असल्याचे सांगण्यात आले होते व आम्हाला सांताक्रूझ स्मशानभूमीत येण्यास सांगितले होते.

(हेही वाचा : पोलिसांना आता ‘गर्मी में भी थंडी का एहसास’!)

वडिलांचा चेहराही दाखवला नाही!

आम्ही सांताक्रूझ स्मशानभूमीत गेलो असता  त्याठिकाणी आम्ही वडिलांचा चेहरा बघायचा आहे, असे त्यांना शववाहिनीतून घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी कोरोनाचे रुग्ण असल्याचे कारण देऊन आम्हाला परवानगी नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांना गुंडाळण्यात आलेल्या कापडात त्यांचे शरीर बारिक झाल्यासारखे आणि उंची कमी असल्याचे लक्षात आले. अंत्यसंस्कारानंतर आम्ही त्यांची अस्थी नाशिकला नेल्या आणि माझे वडील गेल्याचे समजून सर्व विधी पार पाडल्या, असे विजय यांनी सांगितले.

एका वर्षानंतर वडील जिवंत असल्याचा व्हिडिओ व्हायरल!  

एका वर्षांनंतर म्हणजे गुरुवारी विजय आणि उल्हासनगर येथे राहणारी बहीण प्रमिला यांनी व्हायरल झालेला व्हिडियो बघितला असता  वडिलांना जिवंत पाहून ते स्तब्ध झाले. आम्हाला खात्री आहे की, ते आमचे वडीलच आहे, असे प्रमिला हिने म्हटले आहे. गुरुवारी प्रमिला भावाला घेऊन वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी पोलिसांना एक अर्ज देऊन आपली तक्रर दाखल केली. त्यांना पोलिसांनी सांगितले की त्यांना व्हिडिओच्या तारखे विषयी काही माहिती नाही आणि ते तपासावे लागेल. माझ्या वडिलांचे काय झाले हे मला खरोखर जाणून घ्यायचे आहे, असे प्रमिला हिने म्हटले आहे. या व्हिडियोमुळे आमचे वडील जिवंत असल्याची आशा पल्लवित झाली असून ते कुठल्याही क्षणी आमच्यासमोर येतील असेही आम्हाला वाटत असल्याचे प्रमिला हिने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here