हुश्श…कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जची संख्या वाढली! नव्या नोंदीच्या तुलनेत किती आहे फरक?

जानेवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यात पहिल्यांदाच कोरोनाच्या उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची लक्षणीय नोंद झाली. तब्बल २९ हजार ७७१ रुग्णांना एका दिवसांत घरी जाण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पहिल्यांदाच रुग्ण संख्याही इतर दिवसांच्या तुलनेत कमी नोंदवली गेली. सोमवारी नव्या रुग्णांची नोंद ३३ हजार ४७० वर नोंदवली गेली. गेल्या तीन दिवसांपासून चाळीस हजारांच्याही पुढे रुग्ण संख्या नोंदवली गेली होती.

नव्या नोंदीत केवळ चार हजारांचा फरक 

राज्यभरात कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि संबंधित कर्मचारी आजारी पडत असताना रुग्णालयातून उपचार पूर्ण होताच कामावर रुजू होत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती आव्हानात्मक असताना पहिल्यांदाच सोमवारी रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आणि नव्या नोंदीत केवळ चार हजारांचा फरक दिसून आला. शनिवारपासून दर दिवसाला १२ किंवा १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू दिसून येत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला हा आकडा केवळ ७ वर नोंदवला गेला होता. सोमवारी ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सोमवारी १२ रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू मुंबईत, रायगड, पुण्यात आणि साता-यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

(हेही वाचा कोविड रुग्णांचा पारा उतरला : दिवसभरात सहा हजारांनी घटली संख्या)

राज्यातील आतापर्यंतची स्थिती –

राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६९ लाख ५३ हजार ५१४ वर नोंदवली गेली आहे. तर आतापर्यंत ६६ लाख २ हजार १०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here