राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा अशी सूचना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागातील सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सकडून ही सूचना करण्यात आली आहे.
( हेही वाचा : १ एप्रिलपासून काय बदलणार? सामान्यांच्या जीवनावर होणार थेट परिणाम )
राज्य सरकारला टास्क फोर्सकडून सूचना
गेल्या काही दिवसांपासून चीन आणि दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला दिल्या आहेत. सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
देशातील रुग्णसंख्येत वाढ
देशात आज तीन हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले आहे, गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज सरासरी 1,500 लोकांना कोरोनाच्या संसर्गाची लागण होत होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आज एका दिवसात कोरोना व्हायरसच्या 3,016 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी कोरोनाचे 3,375 रुग्ण आढळले होते. याशिवाय 1,396 रुग्ण कोरोमुक्त झाले आहेत. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 13,509 इतकी होती, जी आता 15,208 वर पोहोचली आहे.
Join Our WhatsApp Community