भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने बूस्टर डोस देण्याचे ठरवले. हा डोस सध्या केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि सहव्याधीग्रस्त नागरिकांना दिला जात आहे. पण, हा बूस्टर डोस तितकेसा फायदेशीर नाही, तसेच या बूस्टर डोसचा नेमका फायदा काय? याबाबत तज्ज्ञांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आता सर्वांना बूस्टर डोस दिला जाणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मनात शंका
बूस्टर डोसच्या बाबतीत सरकार पूनर्विचार करु शकतं. तसेच इतर वयोगटातील व्यक्तींना बूस्टर डोस न देण्याचा निर्णयही सरकार घेऊ शकतं. तिस-या डोसचा नेमका फायदा काय अशी शंका सुद्धा तज्ज्ञांच्या मनात असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगितले आहे.
( हेही वाचा: युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत चिंतेत! रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होणार? )
पुनर्विचार केला जाईल?
बूस्टर डोसचा पूनर्विचार केला जाऊ शकतो, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. या धोरणात बदल करण्याचा निर्णय हा बूस्टर डोसचा सखोल अभ्यास करुनच घेतला जाईल, असेही अधिका-याकडून सांगण्यात आले आहे. तसेच ज्या देशांत हा बूस्टर डोस दिला गेला आहे, त्या देशातील नागरिकांना तितकासा फायदा झालेला दिसून आलेला नाही. त्यामुळे बूस्टर डोसबाबत पुनर्विचार केला जाण्याची शक्यता असल्याचे, अधिका-याने सांगितले आहे.