कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोविशील्ड लस प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 500 हून अधिक आरोग्य कर्मचा-यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अॅंटीबॅाडीज आढळून आल्या आहेत. संशोधनानंतर असे समजले की, लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांमध्ये 92 टक्के अॅंटीबॅाडीज आढळून आल्या आहेत.
म्हणून बुस्टर डोस देता येणार नाही
पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि ससून रुग्णालयाने एका अहवालातून ही माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण लोकसंख्येपैकी बहुतांश जणांनी अजूनही कोरोना विरोधी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे असे लोक बुस्टर डोस घेण्यासाठी योग्य नाहीत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
कोविशील्ड लस प्रभावी
558 आरोग्य कर्मचारी ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांच्या चाचणीतून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यात कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत, त्या कर्मचा-यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक अॅंटीबॅाडीज असल्याचं दिसून आलं आहे. कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आल्यानंतर लस घेतलेल्यांमध्ये अॅंटीबॅाडी टिकून राहण्याचा कालावधी देखील वाढला आहे, असे डॅा. तांबे यांनी सांगितले आहे. नुकतंच दिल्लीत करण्यात आलेल्या सहाव्या सीरो सर्वेतही सहभागी झालेल्यांपैकी 90 टक्के नागरिकांमध्ये कोरोना विरोधी अॅंटीबॅाडी आढळून आल्या आहेत.
( हेही वाचा :शिवरायांचा अवमान: दुस-या दिवशीही सेना आक्रमक )
Join Our WhatsApp Community