आनंदाची बातमी! गायी पाळा, फुकट वीज मिळवा!

79

हिंदू धर्मामध्ये गाय हा पवित्र पशु मानला, मानली जाते. जसे या पक्षाचे धार्मिक महत्व आहे, तसे तिचे व्यावहारिक उपयोगही जास्त आहेत. त्यामध्ये आणखी एक नवीन उपयोग समोर आला आहे. तो म्हणजे  गायीच्या शेणाने वीज निर्मिती होणार आहे. ब्रिटेनमध्ये या विषयावर संशोधन सुरु आहे.

अशी होते वीज निर्मिती!

गायीचे शेण घर, अंगण सारवण्यासाठी वापरले जाते. त्याच बरोबर इंधन म्हणून गोवऱ्यांच्या स्वरूपातही वापरलंले जाते. अशा प्रकारे शेणाचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो. परंतु तुम्हाला आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती केली जात आहे. ब्रिटनमधल्या शेतकऱ्यांनी गायीच्या शेणापासून वीज निर्माण करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटिश शेतकऱ्यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर तयार केली आहे. त्या पावडरचा वापर करून बॅटरीज बनवण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांच्या एका गटाने सांगितले.

(हेही वाचा ‘स्मशानात जा आणि भुतांशी बोला’, खोतांचा परबांवर घणाघात)

एक गाय तीन घरांना वर्षभर वीज देईल   

ब्रिटिश शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगात गायीच्या एक किलो शेणापासून एवढी वीज तयार झाली, की त्यावर व्हॅक्यूम क्लीनर पाच तास चालवता येणे शक्य आहे. ब्रिटनमधल्या अर्ला डेअरीने शेणाची पावडर बनवून बॅटरी बनवली आहे. त्याला काऊ पॅटरी असे नाव दिले आहे. AA आकाराच्या पॅटरीजच्या साह्याने साडेतीन तासांपर्यंत कपडे इस्त्री करणे शक्य आहे. हा एक अतिशय उपयुक्त शोध असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे गोपालनाला चालना मिळू शकते. अर्ला या ब्रिटिश डेअरी को-ऑपरेटिव्हद्वारे ही बॅटरी विकसित केली जात आहे. एका गायीच्या शेणापासून तीन घरांना वर्षभर वीज मिळू शकते, असा दावा बॅटरी तज्ज्ञ जी पी बॅटरीज यांनी केला आहे. एक किलो शेण 3.75 किलोवॉट वीज निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत 4 लाख 60 हजार गायींच्या शेणापासून वीज बनवली, तर तब्बल 12 लाख ब्रिटिश घरांना वीजपुरवठा करता येऊ शकतो. डेअरी एका वर्षात 10 लाख टन शेणाचं उत्पादन करते. त्यामुळे वीजनिर्मितीचे मोथे लक्ष्य गाठले जाऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.