भारतीय गायीच्या शेणाला (Cow Dung) परदेशात मोठी मागणी आहे. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल ३८६ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतात शेणापासून उपलब्ध झाले. ‘एक्झमपेडिया’ या वस्तूंच्या आयात-निर्यातीशी संबंधित विषयांचा अभ्यास करणार्या कंपनीने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवारांकडे चला ! शरद पवार गटाच्या आमदार, खासदारांचा आग्रह; ‘या’ दिवशी घेऊ शकतात मोठा निर्णय)
भारतीय गायीचे शेण (Cow Dung) हे शेतीसाठी संजीवनी ठरते, असे परदेशातील अनेक शेतकरी मानतात. मालदीव, चीन, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्राझिल, अर्जेंटिना आदी देशांत भारतीय गायीचे शेण (Cow Dung) अथवा तिच्या पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे. ३८६ कोटी रुपयांपैकी जवळपास १२५ कोटी रुपये मूल्याचे निवळ शेण परदेशात निर्यात करण्यात आले. गायीच्या शेणापासून बनवलेले १७३ कोटी रुपये मूल्याचे खतही निर्यात झाले. गायीचे शेण असलेल्या ‘कंपोस्ट खता’चीही वर्षभरात ८८ कोटी रुपयांची निर्यात झाली.
Join Our WhatsApp Community