राजस्थानमधील (Rajasthan) धौलपूरमध्ये (Dholpur) गो तस्करांनी गोरक्षकांच्या गटावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोरक्षकांच्या गटाला मिळालेल्या माहितीनुसार गो तस्करांना पकडण्यासाठी गेले होते. ते गो तस्कर (Cow smugglers) एका कंटेनरमध्ये गाईंना घेऊन धौलपूरहून उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) जात होते.
( हेही वाचा : पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदरांचा उपद्रव; Dr. Neelam Gorhe यांनी घेतली घटनेची दखल)
गोरक्षक (Go rakshak) घटनास्थळी पोहोचतात गो तस्करांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक गोरक्षक जखमी झाला. तर दुसरीकडे गो तस्करांनी गाईंनी भरलेला कंटेनर आणि वाहने घेऊन घटनास्थळांवरून पळ काढला. जखमी गोरक्षकावर उपचार सुरु असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.
गोरक्षकांवर (Go rakshak) झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून तीन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी गो तस्करांचे वाहन आणि गाई असलेला कंटेनर देखील जप्त केला आहे. पोलिस आता या प्रकरणात एफआयआर नोंदवून पुढील कारवाई करत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community